नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळण्याची अनेकांची इच्छा आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण महाविद्यालयीन शिक्षण विभागात ग्रंथपाल, पीटी इन्स्ट्रक्टर आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. राजस्थान लोकसेवा आयोगाने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.
आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 533 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ग्रंथपालच्या 247, पीटी प्रशिक्षकाच्या 247 आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 39 पदांचा समावेश आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना अधिकृत वेबसाईट rpsc.rajasthan.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करावा लागणार आहे.
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क 600 रुपये भरावे लागणार आहे. SC, ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे अर्ज शुल्क 400 रुपये असणार आहे.
वयोमर्यादा काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. राज्यातील महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.