NLC Recruitment 2023 नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. कारण NLC India Limited ने कार्यकारी अभियंता, उपमहाव्यवस्थापक आणि इतर पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. (NLC Recruitment 2023) NLC India च्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे. (NLC Recruitment 2023) त्यामुळे इच्छुकांनी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेच अर्ज करावा. (NLC Recruitment 2023)
या रिक्त सर्व पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2023 आहे. पात्र उमेदवार NLC इंडिया लिमिटेड भरतीसाठी अधिकृत वेबसाइट www.nlcindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
एकूण पदसंख्या किती?
NLC India च्या या भरती प्रक्रियेत एकूण 284 पदे भरली जाणार आहेत.
कोण-कोणती पदे भरली जाणार?
या रिक्त पदांमध्ये कार्यकारी अभियंता, उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण / EWS / OBC उमेदवारांसाठी 854 रुपये आणि SC, ST आणि दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी 350 रुपये निश्चित आहेत.
NLC भर्ती 2023 ची निवड प्रक्रिया :
NLC India च्या या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.