पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 73 पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 17,000 ते 75,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विशेषज्ञ (बालरोगतज्ञ), विशेषज्ञ (अनेस्थेटिस्ट), शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ऑर्थोपेडिक्स, मानसोपचारतज्ज्ञ, विशेषज्ञ OBGY/स्त्रीरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष), हॉस्पिटल मॅनेजर यांसह इतर अनेक पदांसाठी भरती केली जात आहे.
यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, 14 डिसेंबर, 2023 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रत्नागिरी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया..
– पदाचे नाव : जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट, जिल्हा कार्यक्रम समन्वयक-RNTCP, जिल्हा सल्लागार- NTCP, CPHC सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस (अंमलबजावणी अभियंता) यांसह इतर अनेक पदे भरली जाणार आहेत.
– एकूण रिक्त पदे : 73 पदे.
– नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी.
– वेतन / मानधन : 17,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– अर्ज शुल्क : खुल्या श्रेणीचे अर्ज शुल्क – रु. 150/- आरक्षित श्रेणी अर्ज शुल्क – रु. 100/-
– वयोमर्यादा : 38 वर्षे ते 43 वर्षे
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 5 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://ratnagiri.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.