पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या ठिकाणी अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान या विभागात सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, एमपीडब्ल्यू -पुरुष आणि कर्मचारी परिचारिका या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे बारावी पास उमेदवारांनाही संधी मिळू शकणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकियेंतर्गत एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
ही भरती प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झाली असून, 28 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpchandrapur.co.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, एमपीडब्ल्यू -पुरुष आणि कर्मचारी परिचारिका.
– एकूण रिक्त पदे : 30 पदे.
– नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर.
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, कोणताही वैद्यकीय पदवीधर, जी.एन.एम. / बी. एससी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु. 35,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रूग्णालय परिसर, ,चं