Mumbai News : मुंबई : मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने तीन हजार पदे भरण्याच्या सरकारच्या निर्णयाचे विधानपरिषदेत काल (ता. २५) पडसाद उमटले. या निर्णयावरून विरोधी आमदारांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिले आहे. ही भरती तात्पुरती आहे. ही काही परमनंट अरेंजमेंट नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, कंत्राटी भरतीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. सरकारने यावर निवेदन करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. (Mumbai News) या निर्देशानुसार, देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देऊन ही भरती कंत्राटी पद्धतीने नसून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून भरती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून भरण्यात येणाऱ्या या तीन हजार कर्मचाऱ्यांना केवळ सुरक्षाविषयक कामकाज, गार्डविषयक कर्तव्याची कामे देण्यात येणार असून कायदेविषयक अमंलबजावणीचे काम देण्यात येणार नाही.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून उपलब्ध करून देण्यात आलेले पोलीस हे २४ जुलै २०२३ च्या निर्णयान्वये नियमित पोलीस शिपाई पदावर कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या सेवा संपुष्टात येणार आहेत. म्हणजेच ११ महिन्यांनी किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तात्पुरत्या पोलिसांची सेवा संपुष्टात येणार आहे. (Mumbai News) राज्य सरकारच्या महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांना शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणी इत्यादी करता यापूर्वीही सुरक्षा नियमित केली आहेत आणि वापरली जात आहेत. त्यामुळे ही भरती कंत्राटीपद्धतीने घेतली जात नाहीत, यावर फडणवीसांनी जोर दिला.
मुंबईसारख्या शहरांत १० हजार पोलिसांची तूट ठेवून शहर सुरक्षित ठेवता येत नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नाही तर या महामंडळातून जसे इतर आस्थापनांना पोलीस दिले जातात, तसेच मुंबई पोलिसांना दिले जाणार आहेत. कुठेही यात कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही. तो करण्याचा विचारही नाही, असेही फडणवीसांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तयार केले होते. या महामंडळातून ज्यांना नियुक्त केले जाते, त्यांना विमानतळे, इतर आस्थापनांवर गार्डिंगची कर्तव्य दिली जातात. गेली तीन वर्षे पोलीस भरती न झाल्याने मुंबई पोलिसांची मोठी तूट झाली आहे. एकावेळी अनेक भरती करता येत नाही, कारण तेवढी ट्रेनिंग सुविधा नाही. (Mumbai News) पण १८ हजारांची करतो आहे. भरती पूर्ण झाली असून, ते आता ट्रेनिंगला जाणार आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
पोलीस कधीही कंत्राटी असू शकत नाहीत
कोरोना काळात पोलीस भरती न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. जास्तीत जास्त ट्रेनिंगची व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. धोके वाढत आहेत, त्यानुसार काही पोस्ट या कंत्राटी पद्धतीने भराव्या लागतील, कारण रोज नवीन धोके वाढत आहेत, पोलीस कधीही कंत्राटी असू शकत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. (Mumbai News) फडणवीस यांच्या या निवेदनावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पोलीस दलातून निवृत्त झालेले पण नियमात बसणाऱ्यांना अशा मंडळात घ्यावे, अशी सूचना केली. अनिल परब यांची सूचना लक्षात घेऊन त्याचा विचार केला जाईल, असे उत्तर फडणवीस यांनी दिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : ट्रकचालकाचा बदला घेण्यासाठी दूचाकीस्वाराने उडवली पोलिसांची झोप; आता खातोय जेलची हवा!
Mumbai News : धक्कादायक; ४ मुलींचा ६० हजारांत सौदा; नवी मुंबईत ऑनलाइन सेक्स रॅकेट उद्ध्वस्त!