पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराची मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
पुणे महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
या पदांसाठी 13 आणि 27 जून 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.pmc.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी.
– एकूण रिक्त पदे : 78 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस. / डी.एन.बी., एम.बी.बी.एस., डी.एम. / एमसीएच.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 64,551/- ते रु.1,85,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : प्रत्यक्ष मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 13 आणि 27 जून 2024.
– मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे-411011.