पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सहाय्यक शिक्षक (मराठी आणि उर्दू माध्यम) या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 12 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक (मराठी आणि उर्दू माध्यम).
– एकूण रिक्त पदे : 103 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा 27,500 रूपये
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड मनपा माध्यमिक शाळा संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे-18 (वल्लभनगर एसटी स्टेशन जवळ).
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
https://www.pcmcindia.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.