पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत शिकाऊ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला भिवंडी, ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 210 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. शिकाऊ या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात दरमहा 6,000 ते 10,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. 16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नवप्रिया बिल्डिंग, स्वा. विलासराव देशमुख, तिसरा मजला येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://bncmc.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.