पुणे : पुणे महानगरपालिकेतील विविध पदांच्या ४४८ जागांची भरतीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. हि परीक्षा दोन ते तीन टप्प्यात होणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. या भारती प्रक्रियेत आत्तापर्यंत ४४८ जागांसाठी तब्बल ८७ हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
पुणे महानगरपालिकेत विविध प्रकारचे ४४८ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये सहायक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदांचा समावेश आहे. टंकलेखकासाठी २०० तर सहायक अतिक्रमण निरीक्षकासाठी १०० पदांची रिक्त जागा आहे. तर कनिष्ठ अभियंताच्या स्थापत्य, यांत्रिक, वाहतूक नियोजन या पदांसाठीही भरती केली जाणार आहे. त्यातील स्थापत्य अभियंत्यासाठी १३२ जागा असून यांत्रिक अभियंत्यासाठी ५ तर वाहतूक नियोजन अभियंत्याच्या ४ पदांवर भरती केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी महानगरपालिकेने रिक्त जागांसाठी अर्ज मागविले होते. ४४८ रिक्त जागांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहेत. आत्तापर्यंत ८७ हजाराहून अधिक उमेदवारांनी शुल्कासहित अर्ज केले आहेत. हि भारती प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात होईल. त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया पार पडेल. लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, टंकलेखक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशी टप्प्याटप्प्याने निवड प्रक्रिया पार पडले.