पुणे: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी (Maha-Metro Recruitment 2025) विविध अनुभवी पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना पगार 40,000 ते 2,00,000 पर्यंत मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 10 ऑक्टोबरपर्यंत थेट टपालाद्वारे अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत आहे. महामेट्रोने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, या नियुक्त्या पाच वर्षांच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीच्या आधारावर केल्या जातील.

महामेट्रो प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कुशल आणि अनुभवी व्यावसायिकांना आमंत्रित केले गेले आहे. मुख्यतः अभियंते, व्यवस्थापक आणि संबंधित क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ यांना या प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी उपमहाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण), उपमहाव्यवस्थापक (ई अँड एम) आणि मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) या तीन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तर पुणे प्रकल्पात उपमहाव्यवस्थापक (सुरक्षा आणि प्रशिक्षण) आणि सेक्शन इंजिनीअर (विविध विशेषज्ञता) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पुणे आणि नागपूर दोन्ही प्रकल्पांसाठी सेक्शन इंजिनिअरच्या प्रत्येक विशेषज्ञतेसाठी तीन ते आठ जागा भरण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज आणि संबंधित कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पुढील पत्त्यावर पाठवावी: महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर – 440010. पुण्यातील इच्छुक अर्जदारांसाठी पत्ता: ए2, ए3 ब्लॉक, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, शिवाजीनगर, पुणे – 411001.
निवड प्रक्रिया खालील टप्प्यात केली जाईल: प्रथम पात्रता तपासणी, वैयक्तिक मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
पद आणि पगाराचे तपशील असे आहेत:
नागपूर मेट्रो:
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) – 1 जागा
– बी.ई./बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन
– 19 वर्षांचा अनुभव
– पगार 1,20,000 ते 2,80,000
महाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण) – 1 जागा
– एमबीए (वित्त), मेट्रो प्रकल्पांसाठी मालमत्ता विकास/महसूल क्षेत्रात 7 वर्षांचा अनुभव
– पगार 70,000 ते 2,00,000
उपमहाव्यवस्थापक (ई अँड एम) – 1 जागा
– बी.ई./बी.टेक. इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल
– 7 वर्षांचा अनुभव
– पगार 70,000 ते 2,00,000
पुणे मेट्रो:
उपमहाव्यवस्थापक (सुरक्षा व प्रशिक्षण) – 1 जागा
– बी.ई./बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन
– 7 वर्षांचा अनुभव
– पगार 70,000 ते 2,00,000
पुणे व नागपूर मेट्रो:
सेक्शन इंजिनीअर (विविध विशेषज्ञता) – 3 ते 8 जागा
– बी.ई./बी.टेक.
– 3 वर्षांचा अनुभव
– पगार 40,000 ते 1,25,000
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत गरजेचे आहे.







