Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC Exam: जयंत पाटलांची सरकारकडे मोठी मागणी; MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला, सध्या विद्यार्थ्यांची…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 September 2025, 22:57
MPSC Exam: Jayant Patil's big demand to the government; MPSC preliminary exam postponed, currently students...

Photo-Social Media

पुणे: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी गंभीर संकटात असून त्यांचा जीवघेणा ताण वाढत चालला आहे. या पूर परिस्थितीमुळे बळीराजांचा त्रास तर झाला आहेच, पण त्यांचे मुलं, विशेषतः स्पर्धा परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणारी पोरं आणि पोरीही व्याकुळ झाली आहेत. पुणे, मुंबईसह अनेक शहरांतील बळीराजांची मुले आपल्या आई-वडिलांचे हाल पाहून आणि त्यांच्या शेवाऱ्यांवर पसरलेल्या पाण्याचे व्हिडीओ पाहून हवालदिल झालेली आहेत. अनेक विद्यार्थ्यांसाठी (Jayant Patil) महत्त्वाची एमपीएससीची परीक्षा फक्त दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना या संकटांच्या ओझ्याखाली परीक्षा देणे अवघड ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे येत्या 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. पाटील म्हणाले की, पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिक तयारी सध्या नाही. आयोगाने विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलावी, असा आग्रह त्यांनी केला.

जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावं आणि शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या ठरते. नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थी परीक्षा देता आले नाहीत, तर ते अत्यंत अन्यायकारक ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळणे आवश्यक आहे.

जयंत पाटील यांनी पुढे म्हटले की, तयारी असूनही अशा बिकट परिस्थितीत परीक्षा देणे विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा. पाटील यांच्या मागणीला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे, कारण अनेक परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता आता शिखरावर पोहोचली आहे.

 

विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि समान संधी सुनिश्चित करण्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलणे हेच न्याय्य आणि तातडीचे पाऊल ठरेल, असे पालक आणि शिक्षण तज्ज्ञ देखील मान्य करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Daily Horoscope: सिंह राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ, तर वृश्चिक राशीच्या लोकांनी राहावे सावधान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp