jobs News नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. (jobs News) या भरती प्रक्रियेंतर्गत एक हजार पदे भरली जाणार आहेत. (jobs News) जर तुमच्याकडेही अभियांत्रिकी किंवा एलएलबीची पदवी असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी ठरू शकते. (jobs News)
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून अर्थात पीजीसीआयएलमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती केली जाणार आहे. 1 जुलै 2023 पासून शिकाऊ पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त जागांसाठी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
वयोमर्यादा काय?
उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याची तरतूद आहे. अधिक तपशीलांसाठी अधिकृत सूचना पाहावी.
कसा करावा अर्ज –
अधिकृत वेबसाईट powergrid.in वर भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवर LATEST NEWS च्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट पेजवरील PGCIL Apprentices 2023 Apply Online for 1045 Post च्या लिंकवर जा. याठिकाणी मागितलेल्या माहितीपूर्वी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकता.
अर्ज शुल्क किती?
या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या सर्व रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
कोण करु शकतं अर्ज?
आयटीआयधारकांपासून ते अभियंते आणि एलएलबी पास या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. पात्रता जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शिकाऊ उमेदवारासाठी या रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. यामध्ये डिप्लोमा सिव्हिलसाठी अर्ज करणाऱ्यांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी असावी.