पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये सेवानिवृत्त गट-अ किंवा गट-ब शासकीय/निमशासकीय अधिकारी पदावर भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जाणार असून, या अंतर्गत रिक्ते पदे भरली जाणार आहेत. (Job Update)
महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये गट-ब शासकीय/निमशासकीय अधिकारी किंवा सेवानिवृत्त गट-अ या पदावर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये केवळ एका जागेसाठी भरती केली जात आहे.
जाणून घ्या भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सेवानिवृत्त गट-अ किंवा गट-ब शासकीय/निमशासकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– वयोमर्यादा काय असावी?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 59 ते 64 दरम्यान असणे गरजेचे आहे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2023.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, 13 वा मजला, आस्थापना शाखा, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयासमोर, मुंबई- 400 032.
– कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://dgipr.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.