Job News: पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयात विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयात कनिष्ठ ग्रंथपाल आणि शिपाई या पदावर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी 11 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा बारावी उत्तीर्ण 10, 10 + 2.
– वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा 15,000 ते 69,100 पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2023.
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.