पुणे : नागपूर येथील जिल्हा परिषदेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, नागपूर येथे वॉर्ड युनियन मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 13 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nagpurzp.com/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वॉर्ड युनियन मॅनेजर.
– एकूण रिक्त पदे : 13 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 14 जानेवारी 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : तालुका अभियान व्यवस्थापक, उम्मेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नागपूर, टी.टी. जि. नागपूर.