पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, वर्धा येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, वर्धा येथे अधिकारी, दंत अधिकारी आणि नर्सिंग सहाय्यक यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वर्धा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी आणि नर्सिंग सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : वर्धा, अकोला, अमरावती.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, बीडीएस, बी.एस्सी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,100/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : OIC, Stn HQ (ईसीएचएस सेल), सीएडी पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा-वर्धा-442303.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 20 आणि 21 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीची पत्ता : स्टेशन मुख्यालय, पुलगाव.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.