पुणे : आपल्याला चांगली नोकरी मिळाली, असे अनेकांनाच वाटत असतं. त्यानुसार, स्पर्धापरीक्षा असो वा इतर कोणत्याही परीक्षा यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि टी.जी.टी. या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सातारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 38,000 पर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.sainiksatara.org/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी आणि टी.जी.टी.
– नोकरीचे ठिकाण : सातारा.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 28,000/- ते रु. 38,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 26 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : सैनिक स्कूल सातारा पो.बॉक्स नं-20, सदर बाजार, जि. सातारा – 415001.