पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न असतात. त्यात तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पुण्याच्या औंध येथील जिल्हा रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पुण्याच्या औंध येथील जिल्हा रुग्णालयात एआरटी वैद्यकीय अधिकारी, एआरटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आयसीटीसी समुपदेशक, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 2 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला 21 हजार ते 72 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पिटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे 27 या पत्त्यावर संबंधित इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://pune.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.