पुणे : बॉम्बे हायकार्ट अर्थात मुंबई उच्च न्यायालय येथे आता तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कारण, या ठिकाणी काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची मुभा असणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (निवृत्त न्यायिक अधिकारी) या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर, सोलापूर, ठाणे, रायगड-अलिबाग, नाशिक या ठिकाणी जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे.
यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकियेंतर्गत 6 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (निवृत्त न्यायिक अधिकारी).
– एकूण रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर, सोलापूर, ठाणे, रायगड-अलिबाग, नाशिक.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 नोव्हेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : rgrp-bhc@bhc.gov.in
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई – 400 032.