पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, मुंबई येथे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, क्षमता निर्माण विशेषज्ञ, सहाय्यक व्यवस्थापक वित्त, सहाय्यक व्यवस्थापक-एचआर आणि प्रशासन या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.tiss.edu/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशासक सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक- वित्त, एचआर आणि प्रशासन, वित्त आणि मानव संसाधन अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,734/- ते रु. 1,47,746/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024.