पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, महाराष्ट्र अराजपत्रित विभागात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अराजपत्रित विभागात उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1333 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून, 04 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.