पुणे : सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो या विभागाविषयी अनेकांना माहिती असेलच. भारत सरकारची ही एक तपास यंत्रणा आहे. याच विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा तुम्हाला घेता येणार आहे. नोकरीसाठी इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो या विभागात सल्लागार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सल्लागार.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, 10 वा मजला, प्लॉट नं. सी- 35-ए, जी ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई-400098.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://cbi.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.