पुणे : मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 2 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, येथे वरिष्ठ सहयोगी (इंजिन) या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ सहयोगी (इंजिन).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मे 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता कार्यालय, भंडार भवन, तिसरा मजला, एन.व्ही. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – ४००१०१०.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://mumbaiport.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.