नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ने रिक्त पदांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 119 गट क पदांवर थेट भरती केली जाणार आहे.
या सरकारी नोकरीच्या रिक्त पदांसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक रोजगार संबंधित माहिती (अधिकृत अधिसूचना) वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
काय असावी शैक्षणिक पात्रता?
ITI / Diploma / B.Sc (नर्सिंग) अचूक माहितीसाठी या नोकरीसाठी प्रकाशित केलेली अधिसूचना पाहावी. ती BEML च्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
कोणत्या पदांवर होणार भरती?
डिप्लोमा ट्रेनी मेकॅनिकल, डिप्लोमा ट्रेनी-इलेक्ट्रिकल, डिप्लोमा ट्रेनी-सिव्हिल, ITI प्रशिक्षणार्थी – टर्नर, ITI प्रशिक्षणार्थी – मशिनिस्ट
एकूण रिक्त जागा – 119 पदे
महत्त्वाच्या तारखा
नोकरी प्रकाशित तारीख: 28-09-2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18-10-2023
काय असावी वयोमर्यादा?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 29 वर्षांपर्यंत असावे. त्यासाठी प्रकाशित अधिसूचना पहा.
कशी असेल निवड प्रक्रिया?
या सरकारी नोकरीमध्ये, संगणक आधारित लेखी परीक्षेतील त्यांच्या कामगिरीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
किती मिळू शकतो पगार?
वेतनमान 16,900 – 85,570/- प्रति महिना असेल. मात्र, पगाराशी संबंधित अधिक माहितीसाठी या सरकारी नोकरीची अधिकृत सूचना पाहावी.
कुठं करावा अर्ज?
पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात. यासाठी https://www.bemlindia.in/careers/current-recruitments/ वर जाऊन अर्ज करता येईल.