पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, जिल्हा परिषद, अमरावती येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अमरावती येथे जिल्हा परिषदेत पॅनल विधीतज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 5 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पॅनलवरील विधीतज्ञ.
– एकूण रिक्त पदे : 05 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अमरावती.
– शैक्षणिक पात्रता : एल.एल.बी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठण्याचा पत्ता : उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा), जिल्हा परिषद अमरावती