पुणे : चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रयत्नच करावे लागतात. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.gacnagpur.org/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक.
– नोकरी ठिकाण : नागपूर.
– वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 12 मार्च 2025.
– मुलाखतीचा पत्ता : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, उमरेड रोड, सकदारदारा चौक, नागपूर 440024.