Job News पुणे : रेल्वे विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ग्रुप “सी” लेवल – २ आणि भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल – १ पदांसाठी भरती केली जाणार आहे. (Job News) या भरतीअंतर्गत ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Job News)
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतजाणून घेऊया.
* पदाचे नाव -ग्रुप “सी” लेवल-२ आणि भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल-१
* एकूण पदसंख्या – ८
* शैक्षणिक पात्रता –
ग्रुप “सी” लेवल-२ : १२ वी पास किंवा त्याच्या समकक्ष कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून ५० टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक.
किंवा ITI पास (NCVT किंवा SCVT ने मंजूर केलेल्या ट्रेडमध्ये) सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि S&T विभागातील कारागीरांच्या पदांसाठी.
* भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल-१ : १० वी पास किंवा ITI किंवा समकक्ष किंवा NCVT द्वारे दिलेले राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार स्तर-1 (७ वी CPC) प्रमाणपत्र (NAC). (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि S&T विभागांसाठी)
* वयोमर्यादा
– ग्रुप “सी” लेवल-२ : १८ ते ३० वर्षे.
– भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल-१ : १८ ते ३३ वर्षे
* अर्जाची पद्धती : ऑनलाईन
* महत्वाच्या तारखा
– अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३
* निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेद्वारे
* अधिकृत वेबसाईट : secr.indianrailways.gov.in
* असा करा अर्ज
वरील पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– अर्जांच्या हार्ड कॉपी प्राप्त होणार नाहीत. उमेदवारांना फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
– अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
– देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.
– अधिक माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1LKoCjwRuA_OSUYCMD2hsNz5CUq0v8jgq/view) या लिंकवरील PDF जाहिरात अवश्य बघावी.