Job News : पुणे : बँकेत नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. पण काहींना संधी मिळते तर काहींना प्रयत्नच करावे लागतात. मात्र, आता हा प्रयत्न थांबवण्याची शक्यता आहे. कारण ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये तब्बल 100 रिक्त पदांवर भरती केली जात आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये क्रेडिट ऑफिसर स्केल II या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + 3 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. या भरतीअंतर्गत एकूण 100 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
कुठं निघाली भरती? – बँक ऑफ महाराष्ट्र
एकूण पदसंख्या किती?
– 100
कोणत्या पदांवर भरती?
– क्रेडिट ऑफिसर स्केल II या पदासाठी भरती केली जात आहे.
काय असावी शैक्षणिक पात्रता?
– 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + 3 वर्षे अनुभव
अर्ज फी शुल्क किती?
– खुला / ओबीसी / EWS : 1180 रुपये.
– मागासवर्गीय : 118 रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रियेला सुरूवात – २३ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ नोव्हेंबर २०२३
– अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://bankofmaharashtra.in/ या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेता येऊ शकणार आहे.