नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी बहुतांश जण प्रयत्नही करत असतात. पण आता तुमच्या या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. कारण, रेडिओग्राफर पदासाठी भरती सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या विषयाशी संबंधित शिक्षण घेतले आहे ते ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात.
या रिक्त जागा ओडिशा सब-ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. त्यानुसार, एकूण 414 रेडिओग्राफर पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्जाला सुरुवात 21 सप्टेंबर 2023 पासून झाली आहे.
किती पदे भरली जाणार?
या भरती प्रक्रियेंतर्गत 414 रेडिओग्राफरची पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 378 पदे खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी आहेत तर 36 पदे विशेष प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत.
किती मिळू शकतो पगार?
जर तुमची निवड झाल्यास तुम्हाला पे मॅट्रिक्स लेव्हल 7 नुसार, 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाऊ शकतो.
अर्ज शुल्क किती?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. या रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल. परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
कुठं करावा अर्ज?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2023 असून, रिक्त पदांसाठी फक्त ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला osssc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे.
वयोमर्यादा काय?
या पदांसाठी 21 ते 38 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, ज्याची गणना 15 सप्टेंबर 2023 पासून केली जाईल. आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सवलत मिळेल.