Job News मुंबई : तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 1,22,800 पर्यंत पगार मिळू शकतो. (Job News)
अशी असेल भरती प्रक्रिया…
पदाचे नाव : सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क.
एकूण रिक्त पदे : 260 पदे
वयोमर्यादा काय?
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग- 18 ते 43 वर्षे.
वेतन किती?
दरमहा 25,500 ते 1,22,800 पर्यंत पगार मिळू शकतो.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
कशी असेल निवड प्रक्रिया?
ऑनलाइन परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
परीक्षा शुल्क किती ?
खुला वर्ग : 1000 रूपये, राखीव वर्ग : 900 रूपये माजी सैनिक : कोणतेही शुल्क नाही
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 जुलै 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2023.