Job News नवी दिल्ली : भारत सरकारच्या प्रसार भारती विभागात मोठी भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये रिपोर्टर, न्यूजरिडर आणि विविध पदांसाठी थेट भरती प्रक्रिया होत आहे. या सरकारी नोकरीच्या रिक्त पदांसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आजच अर्ज करावा. (Job News)
कोणकोणती पदे भरणार?
कॉपी एडिटर (इंग्रजी), न्यूजरिडर (इंग्रजी), रिपोर्टर (इंग्रजी), रिपोर्टर (हिंदी) आणि न्यूजरीडर-सह-अनुवादक या पदांवर ही भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
संबंधित उमेदवार हा पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा काय?
उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षापर्यंत असावे. प्रसार भारती भरती वयोमर्यादा शिथिलता आणि इतर माहितीसाठी वेबसाईटला भेट द्यावी.
कशी असेल निवड प्रक्रिया?
मुलाखतीतील मूल्यानुसार, उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्रसार भारती रिक्त पद निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाईटला भेट घेऊन माहिती घेता येऊ शकेल.
पगार किती?
वेतन 35,000 ते 50,000 प्रतिमहिना असणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यास सुरुवात – 22 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑगस्ट 2023.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी, प्रसार भारतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. याच वेबसाईटवर भरती संदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे.