Job News : मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण भारतीय कृषी विमा कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विमा कंपनीने मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठीची भरती जाहीर केली आहे.(Job News)
भारतीय कृषी विमा कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीत निघालेल्या या भरती प्रक्रियेअंतर्गत 30 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय कृषी विमा कंपनी भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण या सर्व महत्वाच्या बाबींची माहिती घेणार आहोत…(Job News)
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी
एकूण पदांची संख्या – 30
शैक्षणिक पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 60 टक्के गुणांसह ऍग्रीकल्चर मार्केटिंग / ऍग्रीकल्चर मार्केटिंग आणि कॉर्पोरेशन / बिझनेस मॅनेजमेंट विषयात पदवी किंवा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + रूरल मॅनेजमेंट / मार्केटिंग / ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट / ऍग्री बिझनेस आणि रूरल डेव्हलोपमेंट विषयात एमबीए किंवा पदव्युत्तर डिप्लोमा / 60 टक्के गुणांसह LLB(Job News)
वयोमर्यादा काय?
खुला प्रवर्ग – 21 ते 30 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.
अर्ज शुल्क –
खुला / ओबीसी – एक हजार रुपये.
मागासवर्गीय / PWD – 200 रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 24 जून 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2023
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.aicofindia.com/AICEng/Pages/default.aspx ला भेट द्यावी.(Job News)