Job News नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. एएआयने कनिष्ठ आणि वरिष्ठ कार्यकारी पदांसह एकूण 342 पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. (Job News)
पात्र उमेदवार विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट www.aai.aero वरून या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. एएआय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर असणार आहे. कनिष्ठ कार्यकारी आणि वरिष्ठ कार्यकारी पदासह इतर पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. (Job News)
कोणती पदे भरली जाणार?
कनिष्ठ सहाय्यक (अधिकारी) – 9, वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल) – 9, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग) – 237, कनिष्ठ कार्यकारी (वित्त) – 66, कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) – 3, कनिष्ठ कार्यकारी (कायदा) – 18
वयोमर्यादा काय?
कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक भरतीसाठी उमेदवाराचे वय 4 सप्टेंबर 2023 रोजी कमाल 30 वर्षे असावे. तर कनिष्ठ कार्यकारी भरतीसाठी उमेदवाराचे वय 4 सप्टेंबर 2023 रोजी कमाल 27 वर्षे असावे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, एससी, एसटी उमेदवारांना पाच वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षांची सूट मिळेल. (Job News)
पगार किती?
कनिष्ठ कार्यकारी : 40,000, वरिष्ठ कार्यकारी : 36,000-1,10,000 , कनिष्ठ सहाय्यक : 31,000-92,000