Job News नवी दिल्ली : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ अर्थात ‘SSC’मध्ये विविध 1324 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचनाही जारी करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवाराला 1 लाख 12 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. (Job News)
अशी असेल भरती प्रक्रिया –
‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’मध्ये अनेक पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे केंद्र सरकारच्या CPWD, MES, BRO, NTRO इत्यादी अनेक विभागांमध्ये अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. (Job News)
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे. फी भरण्याचीही ही शेवटची तारीख आहे.
अर्जामध्ये सुधारणा/दुरुस्तीसाठी तारीख –
अर्जामध्ये सुधारणा करण्याची आणि दुरुस्तीसाठीची तारीख 17 ते 18 ऑगस्ट 2023 असणार आहे. हा कालावधी दोन दिवसांचा असेल. (Job News)
किती मिळेल पगार?
या पदांवरील निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. त्यात संगणकावर आधारित लेखी परीक्षेचाही समावेश आहे. निवडल्यास, उमेदवारांना गट ब (नॉन-राजपत्रित) श्रेणीनुसार 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
किती असेल अर्ज शुल्क?
SSC JE पदासाठी अर्ज शुल्क 100 रुपये असणार आहे. महिला उमेदवार, SC, ST, PWD श्रेणी आणि माजी सैनिक यांना कोणतेही अर्ज शुल्क नसणार आहे. (Job News)
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर भेट देऊन शैक्षणिक आणि इतर पात्रता निकषाबाबत माहिती घेता येऊ शकेल.