नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेडने प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या अधिसूचनेनुसार, जम्मू आणि काश्मीर बँकेत शिकाऊ पदासाठी एकूण 390 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्टपासून सुरू झाली.
अशी असेल भरती प्रक्रिया… महत्त्वाच्या तारखा काय?
अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्टपासून सुरू
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2023
काय असावी पात्रता?
उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांना स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेत लिहिता, वाचता, बोलता येत असावे. उमेदवारांकडे संबंधित क्षेत्राच्या अधिवासाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
जम्मू आणि काश्मीर बँकेत शिकाऊ उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. SC, ST, OBC आणि अपंगांना वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
किती मिळेल स्टायपेंड ?
जम्मू आणि काश्मीर बँकेत शिकाऊ शिक्षण घेणार्यांना दरमहा 7500/- + 1500/- स्टायपेंड मिळेल. ही अॅप्रेंटिसशिप एक वर्षासाठी असणार आहे.
निवड कशी होईल?
जम्मू आणि काश्मीर बँकेत शिकाऊ उमेदवारीसाठी निवड गुणवत्तेच्या आधारावर होईल. ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून ही गुणवत्ता तयार केली जाईल. ही परीक्षा 100 गुणांची असेल.