Job News मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण मुंबई मेट्रोमध्ये मोठी भरती केली जाणार आहे. (Job News) या भरती प्रक्रियेंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. ज्युनिअर इंजिनियरपासून ते जनरल मॅनेजरपर्यंत अनेक पदांसाठी ही भरती प्रकिया राबवली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज करावा. (Job News)
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने या सर्व पदांवर भरतीसाठी एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यासाठी अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर सुरू केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना मुंबई मेट्रोची अधिकृत वेबासाईट mmrcl.com वर जाऊन अर्ज करता येऊ शकतो.
कोणती पदे भरली जाणार?
– जनरल मॅनेजर – १, सिनिअर डेप्युटी मॅनेजर : २, डेप्युटी मॅनेजर : २, असिस्टंट मॅनेजर – ७, डेप्युटी इंजिनिअर – १, एन्व्हायरमेंट सायंटिस्ट – १, सुपरवायझर (ऑपरेशन सेफ्टी) – १, सुपरवायझर (मेटेरिअल मॅनेजमेंट) – १, ज्युनिअर इंजिनियर – II (ट्रॅक) – ४, प्रोजेक्ट असिस्टंट (फायनान्स) – २ पदे.
महत्त्वाच्या तारखा…
या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया २१ जून २०२३ रोजी सुरू झाली असून, १ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करता येऊ शकतो.
कशी असेल निवड प्रकिया?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना संबधित क्षेत्रामध्ये त्यांची पात्रता / अनुभवाच्या आधारावर मुलाखतीसाठी निवडले केले जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवारांना माहिती घेता येऊ शकेल.