पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे स्टाफ कारचालक गट ‘क’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत केवळ एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 ही असणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mat.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : स्टाफ कारचालक गट ‘क’.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : 18-27 वर्षे.
– निवड प्रक्रिया : प्राथमिक चाचणी/उद्दिष्ट प्रकार (लिखित) चाचणी, व्यापार चाचणी/ड्रायव्हिंग चाचणी..
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, ५ वा मजला, ‘अ’ विंग, ४८, निष्ठा भवन, न्यू मरीन लाईन्स, मुंबई-२०