Job Alert: पुणे : तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात? तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे. कारण, आता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, नागपूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, नागपूर येथे पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेला 2 जानेवारीपासून सुरुवात झाली असून, 9 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी.
– एकूण रिक्त पदे : 10 पदे.
– शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी / तंत्रज्ञानात उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : 35 वर्षे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वेतन / मानधन : स्टायपेंड रु. 9000/- पदवीधारकांसाठी, रु. 8000/- डिप्लोमाधारकांसाठी.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 2 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : एचआर सेक्शन, सौदामिनी बिल्डिंग, खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन, नागपूर-441102.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mahagenco.in/ वरून माहिती घेता येणार आहे.