पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 29 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे सांख्यिकीशास्त्रज्ञ कम ऑपरेटर, वरिष्ठ वॉर्डन (महिला), वरिष्ठ वॉर्डन (पुरुष), प्रशासकीय सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, लेखा सहाय्यक, ड्रायव्हिंग कौशल्य असलेले मल्टी-टास्क स्टाफ (एमटीएस), वसतिगृह काळजीवाहक (महिला), वसतिगृह काळजीवाहक (पुरुष), मल्टी-टास्क स्टाफ (एमटीएस) यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत 24 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रार (I/c), महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, CETTM MTNL बिल्डिंग, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई 400 076 (महाराष्ट्र) येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mnlumumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.