पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण अशा इच्छुकांचा शोध आता संपणार आहे. कारण, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एस्पिरेशनल ब्लॉक फेलो’ या पदावर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2023 असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नांदेड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : एस्पिरेशनल ब्लॉक फेलो.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 55,000/-.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 3 नोव्हेंबर 2023.
– मुलाखतीची पत्ता : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.
– नोकरीचे ठिकाण : नांदेड.
– अंतिम निकाल प्रकाशन तारीख : 4 नोव्हेंबर 2023.
– या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://nanded.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.