पुणे : नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, अजूनही तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमच्याकडे वैद्यकीय शिक्षण असेल तर मग कामच झालं. तुम्हाला एका हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी मिळण्याची खूपच शक्यता आहे. कारण, अशाच पात्र उमेदवारांसाठी ही भरती केली जात आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 46 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
यासाठी 18 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ltmgh.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 46 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 1,10,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 03 डिसेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2024.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीचा पत्ता : नाडकर्णी सेमिनार हॉल, जनरल सर्जरी विभाग, पहिला मजला, कॉलेज बिल्डिंग, एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन मुंबई ४०० ०२२.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : LTMG हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन, मुंबई 400 022.