तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे वकील पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीड, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रायगड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वकील.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : बीड, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रायगड.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 30,000/- ते रु. 80,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव कार्यालय, DLSA.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://legalservices.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.