पुणे : नागपूरच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 11 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’, नागपूर येथे वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पद भरले जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (गुगल फॉर्म).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2025