तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, महाराष्ट्र येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, महाराष्ट्र येथे वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब असिस्टंट, न्यूजिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, लिपिक, डीईओ, महिला परिचर, चौकीदार आणि सफाई कामगार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला औरंगाबाद किंवा नांदेड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 27 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब सहाय्यक यांसह इतर अनेक.
– शैक्षणिक पात्रता : आठवी उत्तीर्ण, पदवी, एमबीबीएस पदवी इ.
– एकूण रिक्त पदे : 27 पदे.
– नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद आणि नांदेड.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 16,800/- ते रु. 1,00,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 18 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2024.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : ईसीएचएस सेल, स्टेशन सेल, औरंगाबाद कॅन्टोन्मेंट.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://echs.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.