Job Alert : मुंबई : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अर्थात एचसीएल मालंजखंड कॉपर प्रकल्पात ट्रेड ॲप्रेंटिस या पदासाठी भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 184 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार 5 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइट hindustancopper.com वर या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.(Job Alert)
एक ते तीन वर्षांचे प्रशिक्षण.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या या भरती मोहिमेमध्ये विविध ट्रेडमधील ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 184 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना ट्रेडवर अवलंबून 1-3 वर्षांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.(Job Alert)
शैक्षणिक पात्रता काय?
प्रथमच अर्ज करणार्या उमेदवारांनी दहावी / मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा 10+2 च्या अंतर्गत समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी आधीच ITI केला आहे, त्यांनी इयत्ता दहावी (किमान 50% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(Job Alert)
वयोमर्यादा काय?
5 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा वेगळी असणार आहे.
कसा करावा अर्ज?
– सर्वप्रथम apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– नोंदणी करा आणि ‘Establishment Search’ वर क्लिक करा आणि नंतर HCL निवडा.
– ट्रेड ॲप्रेंटिस प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि सबमिट करा.
– आता hindustancopper.com या वेबसाइटवर जा.
– करिअर पेजवर जा, फॉर्म भरा, apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर संबंधित बॉक्समध्ये नोंदणी क्रमांक टाका.
– भरलेला फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.Job Alert)