Job News पुणे : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये ७८२ पदांसाठी भारतभरातील होतकरू तरूणांना नोकरीच्या संधी आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे ७८२ प्रशिक्षणार्थी पदे भरण्यात येणार आहेत.Job News
शिकाऊ उमेदवारीसाठी पात्रताः
– १ जून २०२३ रोजी उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
– ८ जूनपासून भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून तिची मुदत ३० जून २०२३ रोजी रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
उमेदवार अधिकृत पोर्टल www.apprenticeshipindia.gov.in वर भेट देऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी विहित पात्रता आणि निकष तपासावेत. आपण या निकषांमध्ये बसत असू तरच अर्ज करावा.
रेल्वे भरतीसाठी पात्रताः
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी विविध पदांनुसार पात्रतेचे निकष आहेत. या पदांनुसार उमेदवारांनी संबंधित ट्रेड आणि इतर पात्रतेमध्ये NCVT प्रमाणपत्रासह १० वी / १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे किमान वय १५ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि कमाल वय २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. ३० जून २०२३ रोजी वयाची गणती केली जाईल. नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, कृपया अधिकृत अधिसूचना पहा.
स्टायपेंड किती असेल?ः
१० वी उत्तीर्ण नवीन उमेदवारांना ६ हजार रुपये आणि बारावी आणि ITI प्रमाणपत्र उमेदवारांना ७ हजार रुपये मासिक स्टायपेंड दिले जाईल.
रेल्वे शिकाऊ उमेदवार असे निवडले जातीलः
प्रशिक्षणार्थी पदांसाठी निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून निवड केलेल्यांना कागदपत्र पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल. उमेदवारांना वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे अनिवार्य असेल.