पुणे, ता.२९ : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे येथे विविध पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेत विशेष कार्य अधिकारी, नायब तहसीलदार, उपअभियंता या पदांसाठी भरती केली जात आहे. उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांना भाईंदर (ठाणे) येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरतीसंबंधी मुलाखत ही 1 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विशेष कार्य अधिकारी, नायब तहसिलदार, उपअभियंता.
– रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : भाईंदर (ठाणे).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2023.
– मुलाखतीची तारीख : 01 नोव्हेंबर 2023.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक-जावक विभाग, मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर.
– निवड प्रक्रिया : या पदांसाठी उमेदवारांची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://www.mbmc.gov.in/ वरून घेता येणार आहे.