पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे ज्येष्ठ निवासी, पूर्णवेळ विशेषज्ञ, होमिओपॅथी चिकित्सक, आयुर्वेद चिकित्सक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 37 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्येष्ठ निवासी, पूर्णवेळ विशेषज्ञ, होमिओपॅथी चिकित्सक, आयुर्वेद चिकित्सक.
– रिक्त पदे : 37 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : बीएएमएस, बीएचएमएस, एमडी, डीएम, पीजी डिप्लोमा, एमबीबीएस.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 50,000/- ते रु. 67,700/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 27, 28 आणि 29 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : प्रशासनिक ब्लॉक, 5 वा मजला, भरती शाखा, अकुर्ली रोड, ठाकुर हाउस जवळ, कांदिवली पूर्व, मुंबई 400101.