Good News मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. जर तुम्हीही बारावी पास असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. बीएमसीत काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Good News)
बीएमसीत कनिष्ठ वैद्यकीय कर्मचारी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 जुलै 2023 असणार आहे. (Good News)
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 जुलै 2023 असणार आहे.
या पदासाठी भरती…
पदाचे नाव – कनिष्ठ वैद्यकीय कर्मचारी
एकूण जागा – 10
शैक्षणिक पात्रता काय?
उमेदवार हा उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य. उमेदवाराकडे कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून सरकारमान्य संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे गरजेचे. त्यासोबतच शासनमान्य संगणकाचा कोर्स असणे आवश्यक. (Good News)
पगार किती – कनिष्ठ वैद्यकीय कर्मचारी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 18 हजार रुपयांपर्यंत प्रति महिना पगार मिळू शकतो.
अर्ज कसा करावा?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. यासाठी 14 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. (Good News)