पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर महाराष्ट्र शासनाच्या एका विभागात नोकरी मिळू शकते. त्यानुसार, आता रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे येथे अपील व न्यायालयीन कामकाजाकरिता मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही आता केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अपील व न्यायालयीन कामकाजाकरिता मदतनीस.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधानभवनसमोर, पुणे ४११००१
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://igrmaharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.